आघात - एक प्रेम कथा - 23

  • 7.7k
  • 4.2k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (23) इंग्रजीचे प्राध्यापक शहापुरे सरांनी मला बोलवून घेतलं. ‘‘प्रशांत, एक काम कर. शिक्षण सोड आणि गावाकडं जा जनावर राखायला. तुझी पात्रता नाही शिकायची. तुला ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’ देऊन डोक्यावर चढवून घेतलं. पुन्हा एखाद्या गरीब मुलाला शिक्षणाला मदत करायला आमची हिंमत होणार नाही तुझ्यासारखं समोर उदाहरण असल्यामुळे. जा, पुन्हा येवू नको माझ्यासमोर.’’ प्रत्येकाचं बोलणं ऐकून घेणं सुरू होतं. दररोजचं कुणाचं तरी बोलणं ठरलेलंच होतं. हे सगळे बोलून घ्यायला, सगळं सोसायला मन तयार होतं. पण सुमैयापासून दूर राहणं जमत नव्हतं. मन मानत नव्हतं. पूर्वपरीक्षा अखेर संपली होती. पहिल्यांदाच तीन-चार विषयात फेल झालो होतो पण सुमैया मात्र