शेतकरी माझा भोळा - 2

  • 10.9k
  • 5.3k

२)शेतकरी माझा भोळा! फाटेची साडे आठ-नवाची येळ आसल, समदं सीतापूर जागं झालं व्हतं. जो तो आपापल्या कामामध्ये गुंग होता. गडी-मान्स ढोरायच्या मांघ व्हती. शेण काढणं, झाडझूड करणं ही कामही चालली व्हती. मालक आपापल्या गडयाला दिसभरात काय काम करायची त्ये सांगत व्हते. बाया-मान्स सैपाक-पाण्याच्या माघ लागल्या व्हत्या. गणपत बी ईचार करत बसला व्हता, बिडी फुकत व्हता. दिसभर काय कराव आन् काय न्हाई या विचारात पडला व्हता. पर काय करावं त्ये ठरत न्हवतं. येकदा वाटायचं शेतामधी जावं पर दुसरे