अंधारछाया - 13

  • 7.1k
  • 3.1k

अंधारछाया तेरा मंगला बेबीला कॉफी दिली. पुन्हा झोपवली कॉटवर. अंगावरची लाली कमी झाली. पण तिच्या हाताला हात लाववेनात! हातपाय सणकून तापले होते. कपाळावर हात ठेवून पाहिला. तर कपाळ थंड होते! ताप पाहिला तर साडे अठ्ठ्याणण्णव काय करावे कळेना. झोपल्या झोपल्या कॉफी पिते म्हणाली, म्हणून दिली कढत कढत. डोळा लागला असे वाटून मी गेले स्वैंपाकघरात. आज जपाच्या माळा झाल्या नाहीत हिच्या. रात्री मग जागावे लागते, एकशेआठ माळा पुऱ्या करायला! दुपारी हे आले. जेवले. तरी ही झोपलेलीच होती. मुले दुपारच्या सुट्टीत खायला आली. तेंव्हा म्हटले, ‘चार घास खाऊन घेतेस का बेबी? तर म्हणाली, ‘नको पडू दे.’ मुले शाळेत गेली परत. आजी म्हणाल्या,