एक चुकलेली वाट भाग ८ अंतिम कसल्याश्या जोरदार माराने आणि थंडगार जाणिवेने तो थरथरला. एक सौम्य गार कळ त्याच्या मस्तकात गेली आणि तो भानावर आला. काही वेळापूर्वी तो बेशुद्ध होऊन पडला होता. आणि त्याला शुद्धीत आणण्यासाठी थंडगार पाण्याचा मारा अखंड चालू होता. त्या पाण्याने त्याचे कपडे पूर्णतः भिजून गेले होते. हलकीशी थंडगार झुळूक त्याच्या अंगाला चाटून गेली आणि त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला. एव्हाना त्याला शुद्धीत आलेलं पाहून देसाईंनी त्याचे ओले राकट केस आपल्या हातात गच्च पकडुन ओढले. अचानक झालेल्या तेवढ्याशा वेदनेनेही तो विव्हळला. त्याने डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न केला... धूसर अंधारात त्याला एक ओळखीची आकृती दिसली.. त्याच्या अंधुक