एक चुकलेली वाट - 7

(11)
  • 17.2k
  • 1
  • 8.8k

एक चुकलेली वाट भाग - ७ जुनाट लाकडी खुर्चीवर ती भेदरल्यासारखी बसून होती. वाऱ्याने अस्ताव्यस्त होऊन क्लिपमधून बाहेर निघालेले केस उनाड पोरांप्रमाणे वाऱ्यावर स्वार होते. कपाळावरून ओघळणारे घामाचे ओघळ तिच्या मानेवरची वळणं पार करत तिच्या घट्ट चिकटलेल्या कपड्यांमध्ये विरून जात होते. खांद्यावरून ढळलेली ओढणी नीट करायचही तिला भान नव्हतं. आपली चोरी पकडली गेल्याने निमुटपणे आपला गुन्हा कबुल करण्यावाचून तिच्याकडे पर्यायच उरला नव्हता. आज अनिकेतसोबत मोरेबाईही होत्या. आपली भूमिका त्यांच्या हातात देऊन अनिकेत खुर्चीवर मस्तपैकी रेलून हातातील चणे संपवत होता. " मिसेस मोरे... हं..." ऐटीत मान किंचितशी डोलवत त्याने मोरेबाईंना इशारा केला. मोरेबाई एखाद्या हरहुन्नरी कलाकारासारख्या आपल्या प्रवेशासाठी तयारच होत्या." मीनाक्षी बाई.... सगळ खर