आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (21) ‘‘बघ प्रशांत, अजून विचार कर. चॅलेंज देते तुला. एक ना एक दिवस तू माझ्या पाठीमागून आल्याशिवाय राहणार नाहीस. सगळयांचा विरोध झुगारून येशील, कारण माझा विरह तुला सहन होणार नाही.’’ ‘‘विरहाच्या गोष्टी बोलू नको. मी तुझ्या प्रेमात पडलोय म्हणून! मी तुझ्यासारखा प्रेमात आंधळा झालोय असे समजू नको. तुलाच वाट पहावी लागेल माझी.’’ ‘‘बघूया कोणाला कुणाची वाट पाहावी लागते, येणारा काळच ठरवेल.’’ मी रागाने तिथून निघून आलो. सुमैया पूर्वीसारखी राहिली नव्हती. माझी आता तिला गरज वाटत नव्हती. बरं झालं तिचं दुसऱ्यांदा खरं रूप मला समजलं. आता इथून पुढं मात्र तिचा नाद न केलेलाच बरं. परीक्षा