दोन टोकं. भाग ४

(11)
  • 19.5k
  • 12.1k

भाग ४ विशाखा घरी येऊन आवरून पटकन झोपून गेली. एकटीच राहत होती, घरी काम करायला आणि जेवण बनवायला काकु होत्या. त्याच सगळं काम करायच्या. त्यांनी बनवलं की खायचं नाहीतर उपाशी झोपायच. कारण तीला काही बनवताच येत नव्हतं, ना कोणी शिकवलं आणि ना कधी हीने शिकण्याचा प्रयत्न केला. स्वभावही तसाच चिडचिडा आणि रागीट पण एकदम बिनधास्त. रागाला आली की मग समोरच्याच काही खरं नसायचं. तीला तीच्याच आश्रमातल्या मुली घाबरायच्या. तेच त्याच्या विरुद्ध सायली..... स्वभावाने नेहमी हसरी, शांत, कधीच रागाला न येणारी, घरातील प्रत्येक काम करणारी. प्रत्येकाशी मिळून मिसळून राहणारी. पण नेहमी वडिलांच्या धाकात वावरणारी, सतत मनावर त्यांचं दडपण घेऊन जगणारी.‌ उद्या दिदीला डिस्चार्ज देणार म्हणल्यावर