प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 4

  • 10.7k
  • 3.4k

क्रमशः-४. तो पुढे बोलायच्या आतच मी बोललो, " हा बोल विठ्ठल."तो- " कोण विठ्ठल ? आरे मित्रा, मी सतीश बोलतोय ! सतीश कांबळे ! ओळखलं का ? २०११ ला आपण पुण्यात एकाच कंपनीत काम करत होतो आणि मी तुझा रुमपार्टनर होतो."मी - " हा, बोल ना सतीश. किती दिवसांनी फोन केलायस जवळजवळ आठ नऊ वर्षे होऊन गेली. इतक्या दिवसांनी कशी काय आठवण काढलीस ?"सतीश- " आरे, खूप जुन्या डायरीतून तुझा फोन नंबर शोधून काढला. फोन लागतोय का न्हाय याची धाकधूक होती, पण लागला. कुठं आहेस ? तब्येत पाणी ठिक आहे ना ?"मी- " पुण्यातच आहे. आज २० दिवस झाले रूमवरच पडून