लग्नाआधीची गोष्ट - (भाग 5)

(12)
  • 11.8k
  • 6.1k

त्या दोघींनी सलाईन लावण्यासाठी माझा हात हातात घेऊन त्यावर एका कापसाने तो भाग साफ करायला सुरुवात केली कि जेणे करून त्यांना हाताची नस सापडेल व तेथे सुई टोचता येईल. पण माझ्या हातावरील नस त्यांना काही केल्या दिसेना तेव्हा त्यांनी दुसर्‍या एका नर्सला बोलावले. ती धावत आली व माझा हात हातात घेऊन बघू लागली. मी जेव्हा तिच्याकडे बघितले तेव्हा मला विश्वासच बसला नाही कारण ती दुसरी तिसरी कोणी नसून सपना होती. एकाच ठिकाणी राहत असून आमची एवढ्या दिवसानी भेट झाली होती. बाकीच्या दोघी निघून गेल्या आता फक्त ती व मी उरलो होतो. मी तिला तिचा नंबर मागितला. ती म्हणाली,