एक चुकलेली वाट - 6

(20)
  • 14.8k
  • 3
  • 8.7k

एक चुकलेली वाट भाग - ६ " का सारखं सारखं बोलवताय मला पोलीस स्टेशनला... आधीच ह्या प्रकरणात खूप बदनामी झालीय माझी ते ही फुकट फाकट... याचे परिणाम खूप वाईट होतील... सांगून ठेवतोय.." दीपक नाईक पिसळल्यासारखा पोलीस स्टेशनमध्ये जोरजोरात ओरडत होता. आधीच वर्तमानपत्रांतून त्यांच्या अतिशोयक्तीच्या नियमांप्रमाणे बऱ्याच गोष्टी छापून आल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत त्याच्यासमोर झुकणारे लोक, त्याच्याच तोंडावर त्याच्याच विरुद्ध चर्चा करत होते. आजवर पुष्कळ गोष्टी त्याने राजरोस केल्या होत्या पण ह्या कानाची खबर कधी त्या कानाला गेली नाही. पण आता मात्र उगाचच तो पोळला जात होता." एकदाच सगळ खर सांगून टाक.. नाही बोलवणार परत.." अनिकेत शांतपणे उत्तरला. पोलीस स्टेशनच्या त्या दहा