ट्रिपल मर्डर केस - 1

(12)
  • 11.8k
  • 4
  • 5.1k

अहमदनगर मधील हिंगणगाव मधली एक सुंदर सकाळ, चिमण्यांची चिव - चिव आणि मोहक वातावरण अगदी सर्व वातावरण प्रसन्न करत होत. पण गावातील एका घराच्या बाजूला मात्र लोकांची खूपच गर्दी जमा झाली होती आणि आपापसात चर्चा चालू होती. हि गर्दी बराच वेळ दरवाजा बाहेरून ठोकावत होती आणि आतून काहीच आवाज येत न्हवता. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे आतमध्ये एसी पण चालू होता त्यामुळे सर्वांना गाढ झोप लागली असेल असा सर्वजण अंदाज बांधत होते पण जेव्हा त्यांनी दरवाज्यावर नीट कान लावून ऐकल्यानंतर त्या आतमधून एका बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येत होता आणि बाकी काहीच हालचाल न्हवती सगळीकडे अगदी भयाण शांतता पसरली होती, अरे