प्रपोज - 1

(20)
  • 19.6k
  • 4
  • 9.8k

!.....प्रपोज......! by sanjay kamble *******************प्रपोज..." काळ्या जिभेची कुठली.... तोंड बंद कर नाहीतर बघ......." मध्यम वयाची महीला कर्मचारी एका पेशंटवर ओरडत होती.. अंगान काहीशी जाड. सावळ्या रंगाची... गोल चेहरा आणी किंचित बसक नाक यामुळे तेच्या नेहमीच रागिट दिसायचे...आवाज तसाच करडा.. हॉस्पीटलच्या शांत वातावरणात तीचा आवाज हॉस्पीटलच्या दुस-या मजल्यावरच्या संपुर्ण वार्डमधे घुमला...... दुपारची कडक उन्हाची दाहकता आता काहीशी कमी होत सुर्य क्षितीजाकडे झुकत चाललेला... पाय-या चढुन हॉस्पीटलच्या वॉर्ड मधुन इन्स्पेक्टर झपाझप पावल टाकत चालत येत होते त्यांच्या मागे दोन हवलदार डोक्यावरची टोपी नीट करत चालत होते. पायातल्या बुटांचा खट्ट खट्ट खट्ट आवाज संपूर्ण वार्डमधे