कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन .. भाग - ९

  • 7.6k
  • 1
  • 2.9k

कादंबरी –प्रेमाविण व्यर्थ हे जीवन.... भाग -९ वा ------------------------------------------------------------------------------ हेल्लो फ्रेंड्स , मी अभिजित सागर देशमुख , खूप दिवस झालेत न आपल्या भेटीला , म्हणून पुन्हा एकदा माझ्या नावासहित ओळख देतोय . कसे आहे ना ..आपले रोजचे रुटीन इतके फास्ट होऊन बसलय की , दिवसभराच्या वर्कलोड मधून मोकळे झाल्यावर काही वेळ निवांतपणाने बसायचे म्हटले तरी छान असा वेळ आपण स्वतःला देऊ शकत नाहीत . म्हणून मग अशा गडबडीत , आणि रोजच्या धामधुमीत आपल्याला कोण कोण भेटलाय , त्याच्याशी आपले काय बोलणे झाले ? हे लक्षात ठेवणे मला जसे फारसे जमत नाहीये , तुमचे पण असेच होत असेल “ याची कल्पना