निर्णय - भाग २

(11)
  • 7.6k
  • 4
  • 3.9k

निर्णय - भाग २दोन वर्षांपूर्वी कुठल्याश्या ट्रेकिंग ग्रुपमध्ये त्यांची ओळख झाली. तिची नुसती बडबड चालू असल्याने सगळेच लगेच तिचे फ्रेंड्स बनले. परंतु कोणाशी न जमणाऱ्या त्याच्याशी मात्र तिची अशी गट्टी जमली की सोबत्यांनाही विश्वास बसेना की ते कालच भेटलेत. दोन दिवस दोघांचीही अखंड बडबड चालू होती की सोबत्यानीही त्यांना एकटच सोडणं पसंत केलं होत. निघायच्या आदल्या रात्री कॅम्प फायर संपवून सगळा ग्रुप आपापल्या तंबूत झोपी गेला होता. हे दोघे मात्र पुन्हा शेकोटी पेटवून तिथेच बस्तान मांडून तारे बघत पडले होते. रात्र जशी चढत होती तसे तारे अजूनच चमकत होते. घराच्या बाल्कनीतुन कधीच नजरेस न पडलेले दृश्य पाहताना ती हरवून गेली