माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 18

  • 5.4k
  • 1
  • 2.3k

१८ हळदीचा दिवस.. दुसरा दिवस उगवला तोच मुळी उत्साहात. म्हणजे मी ठरवून टाकले. आता कात टाकायलाच हवी. काहीतरी छान बोलायलाच हवे. वै ला काल रात्री आला तसा राग जन्मभरात कधी म्हणून येऊ द्यायचा नाही.. मी तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला. म्हटले दिवसाची सुरुवातच अशी करावी ना त्याने पुढचा मूडच बदलून जावा. आज संध्याकाळी हळद. तर सकाळी सगळे तसे मोकळे असणार. त्यात काही संधी मिळते का ते पाहिले पाहिजे. जमले तर कालची चूक सुधारली पाहिजे. बोलण्यात तसा मी हुशार. आई तर म्हणते, नुसता बोलण्यातच हुशार .. अर्थात याबरोबर ती 'अगदी बापासारखा' हे म्हणून आपले कर्तव्य पार पाडते.. तर ही वै