शोध चंद्रशेखरचा! - 22 - अंतिम भाग

(50)
  • 6.7k
  • 3.2k

शोध चंद्रशेखरचा! २२--- इरावतीने ते पाकीट हातात घेतले. हीच ती वस्तू असण्याची शक्यता होती, जी चंद्रशेखर कडून विकीने घेतली होती! तिने ते पाकीट आलटून पालटून पहिले, सामान्य प्रकारचे ते पाकीट होते. अशी पाकीटे, शेकडोंच्या संख्येने फुटपाथवर मिळाली असती. पण असे काहीतरी यात विशेष आहे, कि ज्यासाठी दुबईतून बक्षी सारखा खतरनाक माणूस, मुंबईत आला होता! या पाकिटाचा संबंध जर अतिरेक्यांशी असेलतर? तर हि गोष्ट राजेंच्या कानी घालणे गरजेचे होते. तिने राजेंसरांचा पर्सोनल नंबर फिरवला. राजेंनी तो फोन कट केला. क्षणभरात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. "इन्स्पे. इरावती. एक गोष्ट लक्षात ठेवा. मला डायरेक्ट फोन करत जाऊ नका! कारण हे कॉल लीक होऊ