आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (19) पुन्हा ही मैत्रीण तुला या जगात कधीच दिसणार नाही. मी हादरून गेलो आणि पटकन् ठरविलं रविवारी भेटायला जाण्याचं कारण जीवाचं काही बरं वाईट करून घेईल म्हणूनच. परीक्षा जवळ येत होती. मनाची धास्ती वाढत होती. यात हे समोर उभं असलेलं संकट, किती वेडी मुलगी असेल ही. प्रेमात वेडी झालेली. इतकं काय आहे माझ्यात? हुशारी म्हणूनच ना. पण गरीबीनं गांजलेला मी काय देऊ शकणार हाय? खरंच प्रेम आंधळं असतं म्हणतात ही गोष्ट खरी आहे. पण त्याच प्रेमाचं वास्तवतेचं चटके खूप कठोर आणि खडतर असतात. आईबापाच्या सुखात, समृद्धीत वाढलेली ही मुलगी या बाहेरच्या कठोर जगाची ना