प्रेम असे ही (भाग 7)

(25)
  • 9.9k
  • 1
  • 4.5k

मागील भागावरून पुढे.... ती येणार पण त्याबद्दल करणच्या मनात बिलकुल हुरहूर वैगरे लागली नाही.. पुन्हा पुन्हा प्रेमात तोंडावर पडल्यामुळे असेल कदाचित पण आता त्याला स्वतःला सावरायला यायला लागले होते .... जे घडणार आहे त्याचे हसू नाही , जे घडून गेले त्याचे रडू नाही... एकदम निर्विकार... ती कधी येणार ह्याबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती... त्यामुळे तो आपल्या नेहमीच्या कामात दंग होता... गावातल्या लोकांबरोबर मासे पकडायला जायचे...समुद्रात माश्यांची भरलेली जाळी बोटीवर खेचायची... संध्याकाळी माश्यांची भरलेल्या टोपल्यात बंदरात आणायच्या... जाळी नीट करायची.. बर्फ होडीत भरायचा.... अशी अत्यंत मेहनतीची कामे करून त्याच्या शरीरात खूप बदल झाला होता... त्याचे आधीचे स्नायू आता तरारून फुगले होते... शरीराला एक