माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 17

  • 5.8k
  • 2
  • 2.3k

१७ मौनं सर्वार्थ? दोघांचा ससेमिरा टळावा म्हणून मग गुपचुप मग गच्चीवरच्या झोपाळ्यावर जाऊन बसलो. आकाशात पौर्णिमेचा चंद्र होता. टिपूर चांदणे पडलेले. दुपारच्या झोपेनंतर आता कसली झोप येतेय. दिवसभरात आज हार्डली काही वेळ भेटली वै. सगळ्या दिवसाचा हिशेब.. त्यापेक्षा गेल्या दोन दिवसांचा हिशेब लावत लोळून राहिलो. नशिब कोणी नवीन पाहुणे मंडळीपैकी वैद्यकीय सल्ल्यासाठी पाठोपाठ आली नाहीत. बहुधा उद्या विचारतील.. आज ही काही ओळी सुचल्या. मेंदीवरून.. हातावर तुझ्या नक्षी गं मेंदीची तू सखी माझ्या खास गं प्रीतीची.. माझ्या मनीची प्रीत तू गं लाजरी माझ्याच मनी तू दिसशील गं साजरी.. वाटते अर्थहीन आणिक गं उदास तुजविण सखये सारे गं जग