ती एक शापिता! (२३) बँकेच्या घड्याळाने 'टण' असा आवाज दिला. अशोकने घड्याळाकडे पाहिले. दुपारचे अडीच वाजत असलेले पाहून अशोक मनात म्हणाला, 'अडीच वाजले. म्हणजे पीयूष घरी पोहोचला असेल. त..त.. त्याने माधवीला मिठीत घेतले असणार आणि ज्या स्पर्शासाठी माधवी आसुसलेली आहे, ती ज्या सुखासाठी तळमळत होती ते सारे घडत असणार, घडले असणार. त्यांच्या प्रेमाला बहर आला असणार. माझा अडथळाही नसल्यामुळे ते दोघे अधिक उन्मुक्तपणे, बिनधास्तपणे, आक्रमकपणे ते सुख लुटत असणार...' त्या दिवशी दुपारी पीयूष-माधवी या दोघांमध्ये अशोकला हवे असलेले संबंध स्थापित झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनी अशोक बँकेच्या कामावर हजर झाला. त्यामागेही त्याचा त्या दोघांना पूर्ण एकांत मिळावा, ते संबंध अधिक दृढ व्हावेत,