निर्णय - भाग १

(17)
  • 12.2k
  • 5
  • 5k

निर्णय - भाग १आपल्या भरजरी लेहेंग्याचा दुपट्टा सांभाळत आणि चेहऱ्यावर उसनं हसू आणत तिने पुन्हा नंबर डायल केला. पलीकडून पुन्हा फोन बंद असल्याची सूचना मिळाली. इतका वेळ गुलाबासारखा टवटवीत तिचा चेहरा हया फोनमुळे पार कोमेजून गेला होता. हिरमुसून तिने फोन कट केला व सभोवार नजर फिरवली. जमलेल्या सर्वांमध्ये कसलीतरी कुजबुज चालू होती. आवंढा गिळत, त्याकडे दुर्लक्ष करत स्वतःशीच उसनं हसत ती मागे वळली. मागे त्या आसू भरल्या डोळ्यांनी तिची माफी मागत होत्या. भरजरी साडीतील नेहमीचा रुबाब जाऊन एक हताश अवघडलेपण त्यांच्या चेहऱ्यावर पसरलं होत. त्यांना असं बघताच ती शरमली. " अहो आई... अस काय करताय.... " तिने त्यांना प्रेमाने मिठीत घेतल.