शोध चंद्रशेखरचा! - 17

(12)
  • 8k
  • 3.3k

शोध चंद्रशेखरचा! १७--- इरावती पोलिसस्टेशनच्या जवळ आली तेव्हा, तिला एक कार वऱ्हांड्यात उभी रहात असलेली दिसली. आणि त्यातून कोणीतरी उतरत होते. दारे उघडत असताना कारवाल्याला, इरावती साईड मिरर मध्ये दिसली असावी. कारच्या उघड्या खिडकीतून, कोणीतरी फायरिंग केली. इरावतीने बाईक फेकून, जमिनीवर लोटांगण घेतले. त्या दरम्यान तिने होल्डरमधून गन हाती घेतली होती. कारच्या दाराच्या खाली दिसणाऱ्या पायावर तिने फायर केला. उतरणारा माणूस पटकन पुन्हा गाडीत घुसला आणि वेगात गाडी निघून गेली! धूळ झटकत इरावती उभी राहील. तोवर शकील, शिंदेकाका, आणि आशा पोलीस स्टेशन मधून धावत बाहेर आले. कसला आवाज होता, मॅडम? आशाने निरागसपणे विचारले. अरे देवा! तो बुलेट फायरिंगचा आवाज होता!