प्रेम भावनेचा मृदू रंग भरणारा व्हायरस - 3

  • 9.3k
  • 3.2k

क्रमशः-३.हा हा म्हणता दोन आठवडे निघून गेले. जसजसे दिवस जात होते, तसतशी भारतात, त्यातल्या त्यात पुण्यात या व्हायरसच्या रूग्णांची संख्या वाढलेली बातम्यांत पाहायला मिळत होती. ताळाबंदीचा कालावधी अजून वाढण्याच्या शक्यता बातम्यांत वर्तवल्या जात होत्या. आता मात्र घरच्यांच्या आणि गावाकडच्या इतर आठवणींने एक एक दिवस आभाळा एवढा मोठा जाणवू लागला. पुण्यात रूममध्ये बंदिस्त होतो, पण कुणीतरी भल्या मोठ्या दगडाखाली आपलं काळीज बंदिस्त केलंय असं जाणवत होतं. जीव घुसमटायला लागला होता. आण्णाभाऊ साठेंच्या 'फकिरा' कादंबरीत त्यावेळी साथीचा रोग पसरल्यानंतर त्या समाजाची दैनीय अवस्था, पसरलेल्या रोगराईमुळे गावंच्या गावं ओसाड पडलेला प्रसंग, त्यामुळे गावांच्या झालेल्या भकास अवस्थेचे चित्रण प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल, असे कधी स्वप्नातही