मधुचंद्राची रात्र - अशीही

(30)
  • 40.9k
  • 2
  • 11.7k

माणसाच्या आयुष्यात अशी एक रात्र येतेच कि ज्याची तो अर्ध आयुष्य वाट बघत असतो आणि जेव्हा ती रात्र प्रत्यक्षात उगवते तेव्हा खूप म्हणजे खूप फाटते.माझीपण अशीच फाटलेली.... आज आमची मधुचंद्राची रात्र आहे. चार दिवसाआधी माझं आणि मधुचं लग्न झालं. मधु म्हणजे मधुरा जोशी आणि लग्नानंतरची मधुरा भिडे.लग्न अगदी अरेंज पद्धतीने,घरच्यांच्या मर्जीने,पत्रिका वगैरे जुळवून झालं. वडिलांच्याच मित्राची मुलगी.इतकी गोड कि बघताच क्षणी काळजात शिरली.मग काय काळजातून घरात आणेपर्यंत जीवाची जी तगमग होती ना.... मधुरा....नावाप्रमाणेच