माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 16

  • 6.1k
  • 3
  • 2.2k

१६ डिलिव्हरी बाॅय! नंतर मला झोप लागली असावी. स्वप्न पडलेले ते विसरून मी मनसोक्त झोपून उठलो. अंधार झालेला. पाहुणे अजून काही पोहोचले असावेत. आवाज येत होता खालून. मी आळस दिला. किती वाजलेत त्याचा अंदाज घेतला. बहुधा रात्र झाली असावी. आई खोलीत आली नि म्हणाली,"आज बागेत नाही गेलास.. पाणी टाकायला?” “अगं झोप लागली..” “हुं.. परत स्वप्न बिप्न काही..?” मी उगाच तिच्या ट्रॅपमध्ये अडकू नये म्हणून विचारले.. “वाजले किती?” “तेच.. तुला उठवायला पाठवलेय. उठ. काकू बोलावतेय..” “मला? कशाला?” “मदतीसाठी. आणि काय.” “आलो. मी? आणि कसली मदत करणार?" "तूच बघ जाऊन." मी उठून किचन मध्ये गेलो तर काकू ताटं तयार