जुळले प्रेमाचे नाते - भाग-६८

(24)
  • 9.4k
  • 3
  • 3.6k

छान असा नॉनव्हेजचा बेत होता. जेवताना अचानक राजच्या डॅड ला ठसका लागला तस मी समोरच्या ग्लासमधील पाणी त्यांच्या समोर धरलं. पण काही केला त्यांचा ठसका कमी होण्याचं नाव घेत नव्हता. शेवटी मी उठले आणि माझ्या डाव्या हाताने कसला ही विचार न करता त्यांच्या पाठीला चोळलं आणि त्यांना वर बघायला लावलं. तेव्हा कुठे त्यांचा ठसका कमी झाला. आणि त्यांना बर वाटल. "सॉरी हा काका मी काही न विचारता तुमच्या कोटला आणि पाठीला हात लावून चोळल." मी जरा घाबरतच त्यांची माफी मागितली. नाही म्हटलं तरी ते श्रीमंत आणि बाहेरच्या देशात रहाणारे. काय माहीत त्यांना हे आवडेल नाही आवडेल."अग बेटा त्यात सॉरी काय.. बरोबर