आघात - एक प्रेम कथा - 17

  • 5.8k
  • 1
  • 2.5k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (17) पण मला त्यांना एका शब्दानेही विचारता आले नाही. ही खूप मोठी खेदाची गोष्ट होती. भले ते आले नसते पण विचारण्याची एक पद्धत होती. मी चुकत होतो कुठेतरी, त्यांचं जितकं माझ्यावर प्रेम आहे.तितकंचं माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम कमी आहे का? गेल्या गेल्या त्या तिघांची माफी मागितली. ‘‘माफीची काही गरज नाही. प्रशांत, एक गोष्ट बोलायची आहे मला.’’ ‘‘बोल ना!’’ ‘‘आम्ही तुला आजपर्यंत सुमैयाचा ना सोड, तिची मैत्री सोड म्हणून सांगितले. भले तुला ते वाईट वाटलं असेल. तुझ्या मते, आम्ही तिच्याबद्दल खूप वाईट बोललो असेन, वाईट मत व्यक्त केले असेल पण तुझी असलेली तिच्याशी मैत्री आणि