ती एक शापिता! - 21

  • 6.7k
  • 3.3k

ती एक शापिता! (२१) भर दुपारची वेळ होती. सर्वत्र का कोण जाणे भयाण शांतता पसरली होती. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नव्हते. सुबोधचे कुटुंब राहत होते तो परिसर सारा चाकरमान्यांचा! सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत त्या भागात नीरव शांतता असे. पुरुषांसोबत अनेक कुटुंबातील स्त्रियाही नोकरी निमित्ताने बाहेर पडत असल्यामुळे घराघरात मोजकीच माणसे असायची. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर स्त्रियांनाही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडावेच लागते त्यामुळे कुटुंबासोबत मुलांचेही भविष्य उजळते. आर्थिक बाजू भक्कम असली म्हणजे समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा प्राप्त होते. मात्र त्याचवेळी घरकामाचा अतिरिक्त बोझाही स्त्रियांवर पडतो आहे. पत्नी दिवसभर घराबाहेर राहून आर्थिक स्थिती बळकट करते म्हणून कुटुंबातील पुरुष तिला घरकामात मदत