दोन टोकं... भाग १

(19)
  • 35.6k
  • 3
  • 26k

भाग १पहाटेचे चार वाजले होते . रस्ता पुर्ण सामसुम होता. भटकी कुत्री सुद्धा नव्हती रोडवर. टाचणी जरी पडली तरि आवाज येईल इतकी भयानक शांतता होती. काय माहिती का पण अशी शांतता नेहमीच प्रिय असते. तसं तर ती रात्रीच घराबाहेर पडताच नव्हती पण आज कारण अचानक आलं होतं. " माझ्या आजच्या सकाळच्या appointments जरा पुढे ढकल. मी उशीरा येईन . " आपल्या हाताखालच्या नर्सला सुचना देऊन ती निघाली. अंगातला कोट काढून तिथेच ठेवला. केस क्लचने वर बांधून टाकले. तीने गाडी हॉस्पिटलच्या पार्किंगमधून काढली आणि रिकाम्या रस्त्यावर speed मध्ये पळवायला लागली. मज्जा वाटते अशा शांत रोडवर आपण एकटेच, ना कोणाच्या हॉर्नचा आवाज, ना