जुळले प्रेमाचे नाते - भाग-६७

(25)
  • 9.1k
  • 2
  • 3.6k

"थँक्स गणु. कुठून तरी मार्ग निघाला." मी हात जोडून गणुचे आभार मानले. आणि सगळी बुक्स बाजुला ठेवून देऊन झोपण्याचा प्रयत्न केला.पण न राहून मला सारखा एकच प्रश्न सतावत होता आणि तो म्हणजे ती व्यक्ती नक्की कोण असेल... अशी जिला माझ्या आवडीनिवडी महित आहेत. कोण असेल जो मला एवढा चांगलं ओळखत असेल, आणि काय हवं असेल त्याला. असे एकना अनेक प्रश्नांनी डोकं बधीर करत होते. मी एका कुशिवरून दुसऱ्या कुशीवर अलटून-पलटून झोपत होते. पण झोप काही केल्या येत नव्हती. शेवटी देवाचे स्मरण केले तेव्हा कुठे निद्रे देवीने ततास्तु म्हटलं. आणि मी झोपेच्या स्वाधीन झाले. कारण सकाळी कॉलेजनंतर राज च्या घरी जायचं