प्रेम असे ही (भाग 5)

(29)
  • 10.6k
  • 5.2k

मागील भागावरून पुढे..... करण आणी आरती दोघात आता चांगलेच जमू लागले. दोघे आता अगदी मोकळ्या मनाने एकमेकांशी गप्पा मारायचे... कधी काही स्पेशल काही बनवायचे असेल तर ती सुट्टीत त्याच्या घरी जायची.. अगदी बिनधास्त... मग दोघे मिळून खूप मज्जा करायचे.. एकमेकांना मदत करत जेवण बनवणे असो , की एखादा पिक्चर बघणे असो... आता ती त्या घरात पण चांगलीच रुळली होती.. आधी त्याच्या घरात खूप अजागळता होती... तो कपडे कुठे पण फेकत असे... कोणतीही वस्तू जागेवर नसे....पहिल्याच वेळी तिच्या ते लक्षात आले होते पण तेव्हा तो आजारी असल्याने त्याने घर आवरले नसेल असे तिला वाटले... पण नंतर तिच्या लक्षात आले की ही त्याची सवयच