डॉमिनंट - 12 - अंतिम भाग

(29)
  • 7.3k
  • 3.4k

डॉमिनंट भाग बारा भाग अकरापासून पुढे-------- काहीश्या सामसूम झालेल्या त्या वस्तीच्या बाहेर रोडवर मनूने बाईक थांबवली. आरीफ आणि मंदार चटकन उतरले आणि तिथल्याच एका गल्लीत घुसले. मनू बाईक स्टार्ट करून पुढच्या रस्त्याने तिच्या घराकडे वळली. ठरवल्याप्रमाणे तिला एकटीलाच पुढे जायचे होते. आणि वेळ पडल्यासच आरीफ आणि मंदार समोर येणार होते. काही क्षणांतच मनूने मुख्य वस्तीपासून थोड्या बाजूला असलेल्या आपल्या घराजवळ बाईक साईडला लावली आणि ती घराचा दरवाजा उघडण्यासाठी म्हणून पुढे गेली. तिकडे आरीफ आणि मंदार देखिल मनूची घराबाहेरील हालचाल दिसू शकेल अश्या अंतरावर येऊन थांबले होते. "क्या कहते हो मंदार भाय... कौन रहेगा इस सब के पीछे..." आरीफने दबक्या आवाजात