शोध चंद्रशेखरचा! १२---- चंद्रशेखरला हुडकायचे म्हणजे, विकीला त्या रात्रीच्या दोन मजली इमारती पर्यंत जाऊन चौकशी करावी लागणार होती. त्यात हि एक अडचण होतीच. त्याने जेव्हा चंद्रशेखरला गेटच्या पोलला टेकून ठेवले होते, तेव्हा रात्र होती. सर्वत्र सामसूम होती! कोणाला विचारणार? फक्त घरातल्या माणसालाच विचारावे लागणार होते. त्यांच्या कडूनच काही तपास लागू शकणार होता. तो भराभर तयार झाला. ट्रायलसाठी आणलेली गाडी सुरु केली. तो त्या घराकडे निघाला तेव्हा, गाडी पाठोपाठ एक बाईक येत होती. त्याला ती एकदोनदा मिररमध्ये दिसली सुद्धा. पण ती आपल्याला फालो करत असल्याचा त्याला संशय सुद्धा आला नाही! तो त्याच्याच विचारात होता. त्याला ती व्यक्ती कोण आहे हे कळले