जुळले प्रेमाचे नाते - भाग-६६

(26)
  • 10.5k
  • 6
  • 4k

कॉल वाजत होता... रिंग जात होती पण घेत मात्र कोणी नव्हतं.. "अरे यार डॅड आहे कुठे...?? कॉल का घेत नाही आहे..?" राजने मोबाईलकडे बघितला आणि कंटाळुन तो बेडवर फेकून दिला. स्वतःच्या डोक्याला हात लावुन बसला होताच की त्याच्या रूमचा दरवाजावर कोणी तरी वाजवला. कंटाळवाणा चेहरा करतच तो नाखुषीने उठला आणि त्याने दरवाजा उघडला... समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला बघून मात्र त्याचा चेहरा चांगलाच खुलला होता.. कारण समोर त्याचे डॅड उभे होते.."सरप्राईज माय बॉय...." त्यांनी आनंदाने राजला दरवाजातच मिठी मारली. "डॅड.....!!!" राजला समोर बाबांना बघून शब्दच सुचत नव्हते. त्याने ही जोरात मिठी मारली. असे हे बाप-लेक किती तरी वेळ मिठीत होते. नंतर दोघांनी स्वतःच्या भावनांना आवरत