कादंबरी - जिवलगा .. भाग - २२

(23)
  • 18.5k
  • 2
  • 11k

कादंबरी – जिवलगा भाग- २२- वा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------- नेहा म्हणाली - हे बघा मनोहर – आपल्या पहिल्याच भेटीत आपल्यात गैरसमज होणे नकोय , जसे तुम्ही तुमच्या बॉसच्या ऑर्डरी पाळता , तसे मी पण माझ्या बॉसच्या ऑर्डरनुसार काम करण्यास बांधील आहे “ हे इतके सहजपणे कसे विसरून जाताय तुम्ही . असो. तुम्ही ज्या कामासाठी आलात ते करून टाका , तुमचे काम न करता मी लंचला निघून गेले तर , पुन्हा काम होण्यास उशीर लागेल. मला ते आवडणार नाही. जगदीशबाबू तुमचे बॉस जसे आहेत .. तसे आमच्यासाठी सुद्धा ते बॉसच असल्यासारखे आहेत. नेहाचे हे बोलणे ऐकून ..मनोहर इतका खुश झाला की बस ..