आघात - एक प्रेम कथा - 15

  • 6.9k
  • 2.8k

आघात एक प्रेम कथा परशुराम माळी (15) थोडंस वाटून गेलं की आपल्याला ही असं का बोलतेय. याचाच तर आपण शोध घेतोय, पण खरंच शोध घेता घेता ती आपल्याला आपलं करून घेतेय की काय! तिच्या बोलण्यातलं प्रेम , आपुलकी, तळमळ कोड्यात टाकत होती. परत फिरण्याची वेळ झाली, तसं जाता जाता सुमैया म्हणाली, ‘‘प्रशांत, मला एक दिवस खूप खूप बोलायचं आहे. तुझ्याशी बोलले की मगच माझं मन मोकळे होईन. तोपर्यंत मी अस्वस्थच असेन.’’ जाता जाता पुन्हा कोड्यात बोलावं तसं बोलून गेली. मी आज हॉस्टेलवर वेळाने आल्याचं बघून तिघेही चिडले. त्यात सुरेशचा पारा चढला. ‘‘प्रशांत, पुरे आता मैत्रीचे नाते. तुझ्यामुळे आम्हाला बोलून घ्यावं