डॉमिनंट - 9

  • 6.7k
  • 3k

डॉमिनंट भाग नऊ डॉमिनंट भाग आठपासून पुढे.... भाईने आपण बारमध्येच असून चंदूही सोबत असल्याची माहीती डिग्रीला कॉलवर अगोदरच दिली होती. शिवाय तिथून निघून ताबडतोब आपल्या घरी बोलावले होते. इरफान भाईशी बोलून झाल्यावर डिग्रीने मदनला भायच्या घरी निघण्यास सांगितले. पण मदनने डिग्रीला जरूरी कामासाठी त्याला बाहेर जायचे असल्याचे सांगत तिथून भायच्या घरी डायरेक्ट येऊन भेटण्याचे नक्की केले. मदन डिग्रीला सांगून तेथून निघून गेला. डिग्रीच्या मनात मदनबाबत काहीसा गोंधळ असल्याने आणि आता भायही तिथून निघणार असल्याकारणाने नसीरच्या खुनाची खबर पोलिसांना देण्याचा विचार आला. आणि त्याने फारसा विचार न करता तसे लगेचच केले. तसेही पोलिस तिथं पोहोचेपर्यंत तो आणि इरफान भाय शिवाय चंदू