शोध चंद्रशेखरचा! - 9

  • 7.2k
  • 3.3k

शोध चंद्रशेखरचा! ९-- इरावतीच्या डोक्यात प्रचंड गोंधळ मजला होता. चंद्रशेखरच्या अपघाताच्या घटने संदर्भात जे तुकडे हाती आले होते ते, पूर्णचित्र स्पष्ट करण्यास पुरेसे नव्हते. अजूनही चंद्रशेखरचा ठाव ठिकाणा लागलेला नव्हता. अर्जुना आणि शिंदेकाकाच्या गोंधळाने तो किडन्यापर हातून गेला होता. तो या गोंधळाच्या वेळेस कॅफे रुद्राक्ष मधेच असण्याची शक्यता होती. मुळात हि 'किडन्यांपिंगची' कथाच इतकी ठिसूळ होती कि, त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते! एक तर किडन्यापर खंडणीसाठी फोन करतच नाही! हि गोष्ट कस्तुरीला सांगितल्यावर, मग तो तिला फोन करतो. हे कसे? कस्तुरी खंडणीची रक्कम बागेत भरून ती देण्यास इतकी का उच्छुक वाटली? कस्तुरीची माहिती जी अर्जुनाने मिळवली होती, त्यावरून काही गोष्टी