चूक कोणाची..?

(13)
  • 11.1k
  • 2.7k

सुनील आणि काजल यांचं कॉलेज पासून सुरु झालेल्या मैत्रीच रूपांतर आता प्रेमात झालं होत आणि घरी सर्व आधीच माहित असल्यानं कोणाचाच त्यांच्या लग्नाला असा विरोध न्हवता. खूप थाटात दोघांचं लग्न झालं. सर्व एकदम खुश होते. काही महिन्यांनी काजल ला कळल की ती सर्वांना गोड बातमी देणार आहे तिने ही खुशखबर घरात सर्वांना दिली आता तर घरात नेहमीच आनंदी वातावरण असायचं काही महिन्यांनी त्यांना एक गोंडस मुलगी झाली जिचं नाव ठेवलं परी. पुढे मग कामाच्या निमित्ताने आलेला सुनील इकडेच मुंबईमध्ये स्थायिक झाला. मुंबईत तो त्याची बायको काजल आणि त्यांच्या ४ महिन्यांची मुलगी परी यांच्यासोबत राहू लागला, तसा तो एका Corporate कंपनीत