तृष्णा अजूनही अतृप्त - भाग २२

(64)
  • 14.7k
  • 4
  • 5.7k

काही करून तिला रोखायला हवं. त्याला हातातील मंतरलेल्या राखेची आठवण झाली.क्षणासाठी आपला श्वास रोखून तो सावध होत पवित्रा घेतला. ती जवळ यायच्या आत त्याने पोतडीतील मुठभर राख तिच्या दिशेने उधळली. राखेचा स्पर्श होताच ती जागीच थबकली. तिच्या सर्वांगाला वेदना होऊ लागल्या. असह्य वेदनेने की ओरडू लागली. तिला अनयवर हल्ला करायचा होता मात्र एकच जागी खिळली गेल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. हळू हळू तिच्यावर भारी असलेला करालचा प्रभाव क्षीण होत होता मात्र तिच्या चेहऱ्यावरचे रागीट भाव किंबहुना वेदनेमुळे अजुन तीव्र झाले होते. तिला क्षणाचीही उसंत न देता त्याने लगबगीने तिच्याभोवती राखेच रिंगण रेखाटलं. हवेत राखेची धूळ अजुनही असल्याने ती फक्त