कादंबरी - प्रेमाविण व्यर्थ हे जीवन ..भाग - ७

  • 8k
  • 1
  • 3.2k

कादंबरी – प्रेमाविण व्यर्थ हे जीवन भाग- ७ वा ---------------------------------------------------------------------- नमस्कार , मी सरिता मला माहिती आहे.. तुम्ही आश्चर्यचकित झालात , या आधी आपण भेटलेलो आहोत आणि आज पुन्हा मी माझे नाव सांगत मी तुमचे असे स्वागतकरते आहे की आपण पहिल्यांदाच भेटत आहोत , हे तुम्हाला चमत्कारिक वाटणारे आहे. काय करू ? कुणी नववाकोरा चेहेरा माझ्या समोर आला की ,मला लगेच कळते ..हा सागरचा माणूस नक्कीच नाहीये “, मग माझ्या मनाचा बांध असा फुटू लागतो ..आणि मी माझ्या मनाला थांबवत नाही .. बिचाऱ्या मनाने तरी किती आणि काय काय सहन करायचं ? सांगा बरे तुम्हीच . मग मागच्या वेळेला मी