’तुझी गाडी राहु देत इथे, चल माझ्याबरोबर, जरा चक्कर मारुन येऊ’, असे म्हणुन राज त्याच्या गाडीत शिरला, मी सुध्दा त्याच्या मागोमाग गाडीत जाउन बसले. राजने गाडी परत गावात न घेता घाटातुन वर न्हेली. बर्याच वेळ वर वर गेल्यावर राजने त्याची गाडी एका लांब.. मोकळ्या पठारावर उभी केली. तेथुन खालच्या गावातील प्रखर दिवे सुध्दा छान मंद, अंधुक भासत होते. आसमंत कसल्याश्या सुगंधाने भरुन गेला होता. थंडगार वार्याने अंग अंग मोकळं झाल्यासारखे वाटत होते. मी केसांना बांधलेली रिबीन काढुन टाकली आणि इतक्यावेळ आकसुन बसलेले केस वार्याच्या झुळकीबरोबर उडु लागले. मनावर बसलेली वैचारीक धुळ सुध्दा उडुन गेली आणि एकदम हलकं हलकं वाटायला लागलं.