ती एक शापिता! - 18

  • 7k
  • 1
  • 3.3k

ती एक शापिता! (१८) पीयूष सकाळी लवकर उठला. शयनगृहात नजर फिरवत असताना त्याचे लक्ष भिंतीवर लावलेल्या त्याच्या आणि मीताच्या फोटोकडे गेलं. नोंदणी पद्धतीने विवाह झाल्यानंतर त्यांनी मोठ्या हौसेने तो फोटो काढला होता. त्यावेळी ते दोघे विशेषतः मीत खूप आनंदी दिसत होती. का नाही दिसणार? तिचे ज्याच्यावर प्रेम होते, ज्याच्या धाडसावर, वृत्तपत्रातील बेधडक परंतु अभ्यासू आणि वास्तव लेखनावर जिचं प्रेम होते त्या मीताला तिचा प्रियकर पती म्हणून लाभला होता. पीयूषचे तरी वेगळे काय होते? जिच्या रुपावर भाळून तो प्रेम करीत होता ती प्रेयसी त्याच्या जीवनात पत्नी म्हणून आली होती. सहसा बहुतेक कुटुंबात प्रेमविवाहाला विरोध असतो परंतु त्याबाबतीत पीयूष- मीता भाग्यवान ठरले