वाड्यातले दिवस - गहिऱ्या आठवणी ..

  • 5.7k
  • 1.7k

लेख - वाड्यातले दिवस . गहिऱ्या आठवणी . ! ले- अरुण वि.देशपांडे ------------------------------------------------------------------------------------------------- आताचा मी जेष्ठ नागरिक झालो हे सत्य आहेच ,उद्याची सत्तरी खुणावते आहे ,या आधीच्या पिढीतल्या - सत्तरी "वर्गातल्या जेष्ठा इतकी बेहाल -अवस्था नाहीये. त्याचे कारण नव्या आणि आधुनिक जीवनशैलीचे राहणे, जे आता अंगात आणि मनात भिनले आहे, या फायद्यामुळे शरीर आणि मनाने यंग-सिनियर्स " हे नवे गौरव -पीस .मोर-पिसासारखे कौतुकाने मिरवता येते आहे, अशा अनेकात मी आपण आहे हे नि:संकोचंपणे सांगेन. असो. तर हे सगळे सांगायचे प्रयोजन आहे -ते म्हणजे ..आताच्या वर्तमानात मी फक्त शरीराने असतो पण , मनाने मी कायम ..माझ्या गत-दिनाच्या वैभवात लोळत असतो , , तो काळ ,ते दिवस , ती माणसे ..माझ्या अवती-भवती आहेत असा सतत भास होत असतो .. चला