माझ्या अव्यक्त भावना

  • 8k
  • 1.9k

आजचा ही दिवस त्याच्या आठवणीत रमून जाण्यात गेला. गाणी लावली की आधी रोमॅंटिक, हॅपी वाटतंयच. पण आज काल तीच गाणी ऐकुन डोळे भरुन येतात."प्रेम"....प्रेम हा शब्द दोन, भावना अनेक. ज्याच्याशी दिवस-रात्र बोलायची आज मात्र तो एकदम गप्प झालेला. काही क्षण आपल्या आयुष्यात किती आनंद देऊन जातात नाही.. आणि तेच क्षण डोळ्यात अश्रु आणतात. जेव्हा एकत्र होतो ना तेव्हा प्रत्येक क्षण जगलाय मी. पण आता मात्र त्याची प्रकर्षाने आठवण येतेय. हातात मोबाईल घेऊन मॅसेज टाईप केला....वाटत तुला कॉल करावा, पण भीती वाटते घेतलाच नाहीस तर तु.?!....मॅसेज चा रिप्लाय केलाच नाहीस तर...?!पळत जाऊन मिठी मारावीशी वाटते पण तु आलाच नाही तर...?!"का तुम्ही बॉईज