चूक आणि माफी - 13

  • 6.3k
  • 3k

अमेय गावाला आल्यापासून त्याच्या घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू झाली .पैसे नसल्यामुळे कर्ज काढावे लागले .आधीच मोठ्या बहिणीच्या गरोदरपनात कर्ज झालेले .त्यात आता हे आणखीन कर्ज .आणि वडील आजारी असल्यामुळे त्यालाच धावपळ करावी लागत होती . शिवाय संध्याकाळी परीक्षेचा अभ्यास .काही करून त्याला बारावी पास व्हयचेच होते . अमेयच्या परीक्षेचा दिवस जवळ आला . त्याने परीक्षेला जायची सगळी तयारी केली . त्याने देवाला नमस्कार केला .आई वडिलांना नमस्कार केला .आणि तो पेपर द्यायला निघाला .