शोध चंद्रशेखरचा! - 6

  • 6.9k
  • 3.5k

शोध चंद्रशेखरचा! ६--- कॅफे रुद्राक्ष, विकीच्या घरा पासून फक्त हाकेच्या अंतरावर होते. पैशाची बॅग पाठीशी लावून घरी येता येणार होते. दुसरे कारण असे होते कि, गाडी सफाईचा नादात त्याचे कपडे खराब झाले होते, ते पण त्याला चेंज करता येणार होते. तो घरात घुसला, तोंडावरून पाण्याचा हात फिरवला, तोच ओला हात डोक्यावरच्या केसातून पण फिरवला. कपडे बदलले. फसाफसा अंगभर डियो मारला. त्याने मनगटावरल्या घड्याळात नजर टाकली. घरापासून मोजून सात मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर कॅफे रुद्राक्ष होते. आजून त्याच्या कडे बराचसा वेळ होता. खुर्चीत तांगडे फाकवुन बसत, त्याने टीव्ही ऑन केला. ब्रेकिंग न्यूज चालू होत्या. त्याकडे लक्ष न देता, त्याने आधी सिगारेट पेटवली.