शॉपींग म्हणजे सगळ्यांचाच अत्यंत आवडीचा विषय. आणि त्यासाठी प्रत्येकाला कितीही फिरावे लागले तरी त्याबद्दल त्यांची काहीच कुरकुर नसते. आणि जर हेच शॉपींग ऑनलाईन होणार असेल तर मग काय, आनंदी आनंदच. कुठेही न फिरता घरात बसून अनेक वेबस्टोअर्सना भेटी देत, हवी ती मनपसंत वस्तू शोधून खरेदी करण्याचा आनंद काही औरच. मात्र असे ऑनलाईन शॉपींग काही गोष्टींची दक्षता घेऊनच करायला पाहिजे, तरच ते आनंददायक ठरु शकते, अन्यथा या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता असते. ऑनलाईन शॉपींग करण्याआधी ऑनलाईन शॉपींगचे कोणते फायदे आहेत हे आपण पहाणार आहोत. आणि त्यानंतर ऑनलाईन शॉपींग करताना काय काळजी घ्यावी याचीही माहिती आपण या लेखात घेणार आहोत. ऑनलाईन शॉपींगचे