माझ्या लव्हमॅरेजची स्टोरी - 13

(12)
  • 4.9k
  • 2
  • 2.1k

१३ तिचे वर संशोधन? कालच्या दिवसाने माझ्या अपेक्षा वाढवल्या होत्या. काही नाही तर 'मोडक मोडक' म्हणत ती येईल.. मग गप्पा मारीत बसू. उगाच घाई नको म्हणून लवकर उठून तयार होऊन बसलेलो. सकाळी उठून मी गप्पांसाठी विषयही निवडून ठेवलेले! आयत्या वेळी काही सुचण्या न सुचण्याची चिंता नको. नको तेव्हा तोंडी परीक्षेत ब्लँक व्हायची सवय माझी मोडायलाच हवी. पण तोपर्यंत परीक्षेत काॅपी करावी तसे रेडिमेड गप्पांचे विषय शोधून ठेवावेत. आणि मग जमेल तसे बोलत सुटावे. म्हणजे उगाच ती नको म्हणायला, व्हाय आर यू अव्हाॅयडिंग वगैरे. तयार होऊन मी खाली आलो. आता मी कात टाकून अगदी टीपटाॅप झालेलो. लुंगीबिंगी कायमची