शोध चंद्रशेखरचा! - 5

  • 11.3k
  • 4.5k

शोध चंद्रशेखरचा! ५-- "सर, आज एक कॉन्फरन्स आहे. संध्याकाळी आणि डिनर सुद्धा. मी तुमच्या वतीने कन्सेंट कळवलाय. एक नवीन टेरिटोरी आपल्याला मिळू शकते." चैत्राली चंद्रशेखरला सांगत होती. चंद्रशेखरच्या कपाळावर आठ्या पडल्या. कालच तो दुबईहून आला होता. पुन्हा तो प्रवास त्याला नको होता. पण एक छानशी बिझिनेस ऑपॉर्च्युनिटी त्याला सोडवत नव्हती. शिवाय चैत्रालीची फोरसाईट वादातीत होती. "ओके, फ्लाईट कधीची आहे?" "सर, औरंगाबाद फ्लाईट्स अनियमित असतात. म्हणून बुकिंग केलं नाही. बाय रोड जावे लागेल. हार्डली सहा -सात तास लागतील. आणि तुम्हाला लॉंग ड्राईव्हचा आनंदपण घेता येईल! तुम्हाला आवडते ना ड्राइव्ह करायला? पहा,नसता ड्राइव्हर अररेन्ज करता येईल म्हणा!" "का? आपला ऑफिसचा सुलतान कोठे